ही कादंबरी आहे किंवा नाही? हे पुस्तक आहे किंवा नाही? हे तुम्ही वाचल्यावर ठरवा.
तर बारकुल्या ष्टोऱ्या काय आहेत, याचं उत्तर, एका वाक्यात उत्तरे द्या, शास्त्रीय कारणे द्या किंवा रिकाम्या जागा भरा असं देता येत नाही. अमुक लेखकाची तमुक कादंबरी मानवी जीवनाचे बदलते कंगोरे एका वेगळ्या प्रतलावर नेऊन बदलत्या काळातला संघर्षमय प्रवास व नात्यांची घुसमट अधोरेखित करते किंवा पद्यप्राय तपशीलाला गद्यात बसवतील असे प्रचंड ताण, अध्यात्माची प्रचंड बेहोशी ही लेखकाची वैशिष्ट्ये आहेत.......